Breaking News

आष्टीत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

 
आष्टी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कृषी  विषयक  कायदा मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आणणारा हा कायदा आहे. मात्र  महाराष्ट्र सरकारने या कायद्याला स्थगिती दिली आहे. हा कायदा लागू करण्यात यावा, अशी  मागणी भाजपाने केली  असून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत भाजपा कार्यकर्त्यांनी  आष्टी तहसिल समोर निदर्शने केली.  माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.   

No comments