Breaking News

महाविकास आघाडी सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठिशी - ना.अमित देशमुख

 


अमित देशमुखांच्या दौऱ्यात स्व.विलासरावांच्या आठवणींना उजाळागेवराई :  शेतकऱ्यांच्या संकट काळात महाविकास आघाडी सरकार नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टीमुळे मोठे संकट निर्माण झालेले आहे. लवकरच शासनाकडून भरीव मदत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मिळेल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. गेवराई तालुक्यातील खांडवी येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आ.अमरसिंह पंडित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह महुसल व कृषी विभागातील अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. बांधावर जावून त्यांनी परिसरातील शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. अमित देशमुख यांच्या दौर्यात अनेकांनी स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी गेवराई तालुक्यातील मौजे खांडवी येथे पिक आणि शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. माजी आ.अमरसिंह पंडित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह गेवराई तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मंगळवार, दि.२० ऑक्टोबर रोजी दुपारी अमित देशमुख यांनी मौजे खांडवी शिवारातील विद्याबाई तुळशीराम नाईकवाडे व वसंत हरिभाऊ शिंदे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली, यावेळी त्यांनी आस्थेवाईकपणे शेतकर्यांशी संवाद करून त्यांना धिर दिला. गेवराई तालुक्यातील शेती, पिके आणि फळपिकांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तपलशिवार माहिती माजी आ.अमरसिंह पंडित यांनी अमित देशमुख यांना दिली. ना.अमित देशमुख यांच्या दौर्यामध्ये अनेकांना राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची छबी पहावयास मिळाली. गेवराई दौर्याच्या निमित्ताने पंडित-देशमुख परिवाराच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौर्यानंतर शासकीय विश्रामगृहात ना.अमित देशमुख यांनी अधिकार्यांकडून तालुक्यातील नुकसानीची आढावा घेतला. नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जाचक ठरणारी ७०ः३० कोटा पध्दत रद्द केल्याबद्दल माजी आ.अमरसिंह पंडित यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, जयभवानीचे व्हा.चेअरमन जगन्नाथ शिंदे, सभापती जगनपाटील काळे, अशोक नाईकवाडे, दादासाहेब मुंडे, सभापती बाबुराव जाधव, अप्पासाहेब गव्हाणे, जालिंदर पिसाळ, काँग्रेसचे बीड तालुकाध्यक्ष महादेव धांडे, हरिभाऊ सोळंके, बळीराम रसाळ, बाबुराव काकडे, शाम मुळे, बाबासाहेब आठवले, सुभाषराव मस्के, विष्णू हात्ते, श्रीराम आरगडे, राणुजी गोंजारे, श्रीनिवास बेदरे, अक्षय पवार, दत्ता दाभाडे, संदीप मडके यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. No comments