Breaking News

तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेची परळी तालुका नुतन कार्यकारिणी घोषित


तालुकाध्यक्षपदी संगमेश्वर फुटके, शहराध्यक्षपदी प्रा. मधुकर शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी राधाताई फकिरे, शहराध्यक्षपदी अश्विनीताई चौधरी

परळी वैजनाथ : अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेची परळी तालुका नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी संगमेश्वर फुटके, शहराध्यक्षपदी प्रा.मधुकर शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी राधाताई फकिरे, शहराध्यक्षपदी अश्विनीताई चौधरी यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच केली आहे. याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

              

  अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप चव्हाण व जिल्हाध्यक्ष महादेव लोमटे यांनी नुकतीच एक आँनलाईन बैठक घेतली. 

या बैठकीत परळी तालुक्याची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी संगमेश्वर फुटके, सचिव एकनाथ वाघमारे, सहसचिव कानिफनाथ दावलबाजे, कोषाध्यक्ष प्रकाश जुगदर, प्रसिद्धी प्रमुख अतुल बेंडे, विश्वस्त सोमनाथ क्षिरसागर, गणेश जठार तर शहराध्यक्षपदी प्रा.मधुकर शिंदे, उपाध्यक्ष शिवराज सोनटक्के,सचिव बसलिगं साखरे, सहसचिव ईश्वर राऊत,कार्याध्यक्ष विजय राऊत, कोषाध्यक्ष सुनील लांडगे, सहकोषाध्यक्ष निलेश देशमाने, विश्वस्त अनिल बेडे राजकुमार भाग्यवंत, शैलेश काळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी राधाताई फकिरे, शहराध्यक्षपदी अश्विनीताई चौधरी, उपाध्यक्ष मंजुषा साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नुतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments