Breaking News

तरुणावर प्राणघातक हल्ला : जातीवाचक शिवीगाळ करून ब्लेडने केले वार 

गौतम बचुटे । केज  

येथे एका २५ वर्षीय तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून त्याच्या पाठीवर धारदार ब्लेडने वार करून जखमी केल्या प्रकरणी अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील क्रांतीनगर भागातील २५ वर्षीय तरुण अमित विजय भुइंगळे हा दि.११ ऑक्टोबर रोजी त्याच्या घरा समोर उभा असताना रात्री ८:३० वा च्या दरम्यान उमेर मुस्तफा फारोकी रा. रोजा मोहल्ला याने तू रस्त्यात का उभा राहीला? असे म्हणून गच्चीला धरून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच पाठीवर व डाव्या हाताच्या पोटरीवर धारदार ब्लेडने वार करून अमित भुइंगळे यास जखमी केले.

अमित भुईंगळे याने दि.१४ रोजी रोजी केज पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून गु.र.नं. ४४५/२०२० भा.दं.वि. ३२४,३२३,५०६ सह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा (३) (१) (४) (आर ) (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे हे पुढील तपास करीत आहेत.No comments