Breaking News

चार वर्षानी भरला ब्रम्हगांव तलाव, आष्टीकरांची तहान भागली..

 के. के. निकाळजे । आष्टी 

शहराला पाणि पुरवठा करणारा ब्रम्हगांव तलाव तब्बल चार वर्षांनी भरल्याने शहरातील तलवार नदीला पाणि आले आहे. त्यामुळे आता आष्टीकरांची तहान भागली आहे.

         

  गेल्या चारवर्षापासून पर्जन्यमान कमी असल्याने, ब्रम्हगांव तलावासह तालुक्यात बरेच तलाव कोरडेठाक पडले होते.परंतु यावर्षी पाऊसाच्या कृृृृपेने तालुक्यातील सर्वच तलाव भरले असून परतीच्या पावसाने दोन दिवसात हजेरी लावल्याने ब्रम्हगांव तलाव ओहरफ्लो झाला आहे. त्यामुळे आष्टीकरांना होणारा पाणिपुरवठा आता सुरूळीत होणार आहे. या ब्रम्हगांव तलावा वरुन तलवार नदीचा उगम होत असल्याने नदी चार वर्षानंतर खळखळ वाहण्यास सुरूवात झाली आहे.

उद्या आ. धसांच्या हस्ते जलपूजन

चार वर्षांनी तलाव भरल्याने आष्टी नगर पंचायतच्या वतीने उद्या  सोमवारी (दि.१२) सकाळी 9 वा. आमदार सुरेश आण्णा धस यांच्याहस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष भारत मुरकूटे यांनी दिली. No comments