Breaking News

ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर आ.धसांनी केली अभ्यासपूर्ण मांडणी


आधी रोखलं
: शरद पवारांनी बोलावलं, संप मागे;  माञ लढा सुरुच राहणार आ. सुरेश धस 

के. के. निकाळजे । आष्टी  

ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर राज्यभर रान उठवणारे विधान परिषदेचे आ.सुरेश धस यांना साखर संघाने बैठकीसाठी अगोदर निमंत्रीत केलं अन् नंतर बैठकीला येवू नका म्हणून सांगितलं.यावर आ.सुरेश धसांसह त्यांच्या पाठीशी असलेल्या संघटनांच्या मुकादमांनी साखर संघासमोर जोरदार निदर्शने सुरू केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे जेव्हा बैठक स्थळी आले तेव्हा सुरेश धसांसह आणखी एका प्रतिनिधीला बैठकीसाठी बोलवण्यात आले. मात्र सुरेश धसांना कोणाच्या सांगण्यावरून साखर संघाने रोखले यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे. 

ऊसतोड कामगारांच्या प्रश्‍नावर साखर संघाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली.यामध्ये मजुरांना 14% तर मुकादमांच्या कमीशनमध्ये अर्धा टक्क्याची वाढ देण्यात आली.या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुडे, माजी मंत्री पंकजा मुंडे,आ.सुरेश धस यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीसाठी साखर संघाने सोमवारी विधान परिषदेचे आ. सुरेश धस यांना निमंत्रीत केले होते.

मात्र नंतर साखर संघाकडून सुरेश धसांना बैठकीपासून वंचित ठेवत बैठकीला प्रवेश नाकारला.त्यानंतर आ.सुरेश धस यांना साखर संघाने निमंत्रण नाकारल्याने संतप्त झालेल्या संघटनांनी साखर संघाबाहेर आंदोलन सुरू केले. सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. सुरेश धस यांना या बैठकीला नेमकं कोणी नाकारले, कोणाच्या सांगण्यावरून सुरेश धस यांना बैठकीपासून मज्जाव करण्यात आला? याचे साखर संघासमोरील आंदोलनात चर्चा सुरू झाली. संतप्त प्रतिक्रिया मुकादमांसह ऊसतोड कामगारांतून व्यक्त होत असतांनाच बैठकस्थळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वासर्वे खा. शरद पवार हे बैठकस्थळी आल्यानंतर त्यांनी सुरेश धसांसह अन्य एका प्रतिनिधीला बैठकीसाठी बोलावले. त्यानंतर या बैठकीमध्ये आ. सुरेश धस यांनी ऊसतोड मजुर, मुकादम, वाहतुकदार यांची बाजू लावून धरत त्यांना न्याय देण्यासाठी तसेच त्यांच्या मजुरीत भाववाढ होण्यासाठी साखर संघासमोर अभ्यासपूर्ण भाषण करुन आपली भूमिका स्पष्ट करत साखर संघाने समाधानकारक भाववाढ देण्याची मागणी लावून धरत कमीत-कमी ८५% वाढ मजुरीत मिळावी अशी मागणी करुन ऊसतोड कामगारांचा संप मुकादमांचे,मजुरांचे नुकसान होऊ नये म्हणून मागे घेत असल्याचे आ. धस यांनी बैठकीतून बाहेर निघताना सांगत जर साखर संघाने परवडणारा दर दिला नाही तर मग मात्र पुन्हा तीन महिन्यांनी पुढचा निर्णय घेऊ असा इशाराही दिला.पण सध्या मुकादम, मजुर आणि वाहतुकदाराचे नुकसान होऊ नये म्हणून संप मागे घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


संघर्षाला भीत नाही....

आम्हाला बैठकीचा निरोप द्यायचा, सन्मानाने बोलवायचे आणि दारात येऊन थोबडीत हाणून माघारी निघा म्हणायचं, ही पद्धत आम्हाला आवडलेली नाही. आम्ही बीड जिल्हावाले आहेत.आम्ही संघर्षाला घाबरत नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे बीडचे आमदार सुरेश धस यांनी दिला. 

बैठकीला न बोलविण्याचे राजकारण बीडवाल्यांनीच केले का? या प्रश्‍नावर धस म्हणाले की, ज्यांनी कोणी हे केले, त्यांना बैठकीतून बाहेर आल्यानंतर विचारा. हा असला प्रकार ज्येष्ठ नेते शरद पवार आणि (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी कधी केला नाही. मी दोनदा ऊसतोड मजुरांच्या मंजुरीवाढीबाबत नेमण्यात आलेल्या लवादाच्या बैठकीला उपस्थित होतो, त्यावेळी असे प्रकार घडले नाहीत. 

मी आंडूपांडू नाही....

ज्या व्यक्तीने तुम्हाला बैठकीला बोलावले नाही. तुमच्यावर अन्याय केला म्हणता. त्याबाबत शरद पवारांकडे गाऱ्हाणं मांडलं का? या प्रश्‍नावर धस उसळून येत म्हणाले की गाऱ्हाणं मांडायला मी तुम्हाला एवढा लेचापेचा वाटतो का? मी अजिबात लेचापेचा नाही. मी आंडूपांडू नाही. 


काही लोक पराभवाची वर्षपूर्ती साजरी करायलाच जिल्ह्यात येतात, अशी टिका सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. त्याबाबत विचारले असता सुरेश धस म्हणाले की, त्याबाबत तुम्ही धनंजय मुंडे यांनाचा विचारा. 


No comments