Breaking News

बिबट्याचा वावर असलेल्या गावांना सागर धस यांची भेटके. के. निकाळजे । आष्टी 

आष्टी आणि पाथर्डी तालुक्याच्या सरहद्दीवरील केळवंडी,मढी,करडवाडी शिरापूर गावात गेल्या आठवभरापासून बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आल्याने या बिबट्यांच्या हल्ल्यात तीन मुलांना आपला जीव गमवावा लागला असून याच पार्श्वभूमीवर आष्टी तालुक्यातील सावरगाव, मढी, शेंडगेवाडी या परिसरात वनविभागाच्या वतीने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला आहे. याठिकाणी वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी ठाण मांडून आहेत.दरम्यान  या गावांना युवानेते सागर धस यांनी भेट  देऊन गावकऱ्यांना भयभीत होऊ नका असा धीर दिला तसेच बिबट्या निदर्शनास आल्यास लगेच वनविभाग व प्रशासनास कळवावे असे आवाहन केले.

करडवाडी येथील सार्थक बुधवंत हा अवघा साडेतीन वर्षाचा मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात दगावल्यानंतर त्यांच्या कुटुंबांची सागर धस यांनी भेट घेतली.वनधिकारी शाम शिरसाठ यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत या परिसरात प्रत्येक ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत तसे १० कर्मचारी त्या ठिकाणी ठाण मांडून असल्याचे सांगितले.सावरगाव मढी येथील बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याची पाहणी सागर धस यांनी केली. यावेळी वनधिकारी शाम शिरसाठ, राजू म्हस्के, प्रविण चंदनशिव, तेजस म्हस्के, दत्ता भगत, गणेश म्हस्के, गणेश मुळे, रोहित वाघमारे, दिपक भगत आदी यावेळी उपस्थीत होते.No comments