Breaking News

भाजपा हटाव...किसान- मजदूर बचाव !

 


काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

बीड : राज्यात आज काँग्रेसच्या वतीनं भाजपा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. बीडमध्ये काँग्रेसचे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. यावेळी भाजपा हटाव..किसान मजदूर बचाव असे फलक हातात घेवून कार्यकर्त्यांनी भाजपा केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा धिक्कार करण्यात आला. 

उत्तर प्रदेशातील  हिथरास मध्ये पीडित मुलीच्या  कुटूंबियांची  भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना पोलीस प्रशासनाकडून बल पूर्वक पोलिस प्रशासनाने योगी सरकारच्या इशाऱ्यावरुन रोखण्यात येवून  त्यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच्या निषेधार्थ तसेच केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी मजूर विरोधी कायदा केल्यानं या विरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसचे राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपा हटाव, किसान- मजूर बचाव, प्रतिकात्मक भारतीय संविधानाचे फलक हातात घेवून कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती आंदोलन स्थळी साजरी करण्यात आली. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे राजकिशोर मोदी, रवींद्र दळवी, दादासाहेब मुंडे, गोविंद साठे, स्तसंग मुंडे, अमर अंथापुरे, शामसुंदर जाधव, रमेश जाधव, सुधाकर कांबळे, एड. राहुल साळवे, प्रशांत पवार यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. No comments