शेतकऱ्यांनी लोकसहभागातून केले रस्त्याचे काम
बाळासाहेब आडागळे । माजलगाव
तालुक्यातील मोठेवाडी गावा नजीक १६ नंबर चारी रस्त्याच्या कामाला परिसरातील शेतकऱ्यांनी दि.२२ गुरूवार रोजी लोकसहभागातून सुरुवात केली आहे.
मोठेवाडी शिवारातील १६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात गाडीबैलासह अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते.वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही या रस्त्याने जाणे-येणे मुश्कील होत होते. तर खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीचालकांचे अपघातही झाले होते. परिसरातील शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात रस्त्याअभावी गैरसोय होत होती. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर परिसरातील संबंधित शेतकऱ्यांनी प्रशासनावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे लक्षात आल्यानंतर काम करून घेत आहेत.
सरपंच अविनाश गोंडे, उपसरपंच विद्यासागर करपे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उद्घाटन करून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली.यावेळी शिवराज औटे, अमोल गोले, ॲड. तुळसीराम रेडे, तुकाराम रासवे यांची उपस्थिती होती.
No comments