राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सचिवपदी अॅड. विजय गव्हाणे
परळी वैजनाथ ः महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाच्या सचिवपदी माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य् शिक्षण संस्था महामंडळाचे दिवंगत सचिव आर.के. जोशी यांचे आकस्मीक निधन झाल्याने ते पद रिक्त झाले होते. त्या रिक्तपदी अॅड. गव्हाणे यांची अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजयनवल पाटील यांनी नियुक्ती केली आहे. मंगळवारी या अनुषंगाने अॅड. गव्हाणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यातून अभ्यासू व्यक्ती, सडेतोड भाषा शैली, तसेच शैक्षणिक प्रश्नांना तड लावणारी हुन्नर ओळखूनच महामंडळाच्या सचिवपदाची धुरा आपण स्वीकारावी, असे अध्यक्ष अॅड. पाटील यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, अॅड. गव्हाणे हे या महामंडळाचे राज्य समन्वयक म्हणून या पुर्वी जबाबदारी सांभाळत होते. महामंडळ व सरकार यांच्यात विविध प्रश्नांच्या अनुषंगाने समन्वयक म्हणून अॅड. गव्हाणे यांनी चर्चा घडवली. त्यातून काही विषय मार्गी लावले आहेत.
No comments