Breaking News

राज्यातील रस्ते दुरुस्त करा अन्यथा उसतोड मजुरांचे निष्पाप बळींचे पाप राज्य सरकारच्या माथी - आ. सुरेश धस

 


के. के. निकाळजे । आष्टी 

तुटपुंजी दरवाढ मिळाल्यानंतर ट्रक,ट्रॅक्टर  व गाड्यात बसून कारखान्यावर जाणारे ऊसतोड मजुर आणि ज्या रस्त्याने होणारी ऊसाच्या गाड्यांच्या वाहतुकीचे रस्ते हे अत्यंत खराब झालेले असून यामुळे अपघाताने मजुर आणि त्यांची मुकी जनावरे दगावण्याची शक्यता लक्षात घेता येत्या दोन दिवसात हे रस्ते दुरुस्त करावेत अन्यथा या निष्पाप बळी जाणाऱ्यांचे पाप हे राज्य सरकारच्या माथी असेल असे आ.सुरेश धस यांनी मत व्यक्त केले आहे.

दहिवंडी जि. सातारा येथे बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी अपघात झालेले सहा माणसे तिथे ऍडमिट आहेत. तसेच बीड तालुक्यातील हेकनमोह येथील एक महिला मृत्यू झालेली तिचा अंत्यविधी करण्यात आला आहे. ही अवस्था व अडचण फक्त राज्यात झालेल्या रस्तावरच्या खड्याच्या दुरावस्थेमुळे झाली आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विनंती आहे की यवतमाळ, वाशिम तसेच विदर्भात दोन जिल्ह्यात, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातुन ऊसतोड मजुरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.या जिल्ह्यातील सर्व मार्गावरील दोन दिवसाच्या आत खड्डे भरून घ्यावेत अन्यथा खडी व कच टाकून या रस्त्याचे दुरुस्ती करावी नसता जनावरे, माणसे मोठ्या प्रमाणात दगावल्यास त्यांचे पाप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच राज्य सरकारला लागेल. तातडीने या प्रश्नावर कारवाई करावी असे मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.No comments