आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास वडवणी पोलिसांची टाळाटाळ
पतीला मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा ; एका पत्नीची पोलिस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी
बीड : पतीला मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. उपचारानंतर गुन्हा दाखल करण्यास गेल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यास वडवणी पोलीस टाळाटाळ करत असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी , अशी मागणी एका पत्नीने पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केलीय.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील रेशम जावळे यांचे पती बलभीम जावळे हे दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री गावात जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या दुकानावर गेले होते. दरम्यान त्याठिकाणी भेय्यासाहेब भास्कर जावळे हा आला व त्याने तू माझ्यावर गुन्हा का? दाखल केला असे म्हणत शिवीगाळ करत धक्काबुकी करून लोखंडी गजाने मारहाण केली. त्याच वेळी त्याचे अन्य नातेवाईक मल्हारी भास्कर जावळे, इंदूबाई भास्कर जावळे, हनुमंत केरबा जावळे यांनी ही माझे पती बलभीम जावळे यांना मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वडवणी पोलीस ठाण्यात रेशम जावळे गेल्या असता गुन्हा नोंद करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप श्रीमती जावळे यांनी केला आहे.
याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात भेय्यासाहेब भास्कर जावळे, मल्हारी भास्कर जावळे, इंदूबाई भास्कर जावळे, हनुमंत केरबा जावळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा. तसेच आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी रेशम जावळे यांनी पोलीस अधीक्षक आर राजा स्वामींना दिलेल्या निवेदनाद्वारे केली असून वरील आरोपींचा गावात दारूचा व्यवसाय असून वडवणी पोलिसांना ते, हप्ता देतायत. म्हणून वडवणी पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप ही श्रीमती जावळे यांनी निवेदनात केला केला आहे.
No comments