साळेगाव खून प्रकरण : जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
गौतम बचुटे । केज
कापूस वेचण्यासाठी गेलेल्या आश्विनी इंगळे या महिलेचा गळा अवळीत डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला असून जोपर्यंत तिच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरकडील मंडळींनी नकार दिला आहे.
तसेच याबाबत तहसीलदार मेंढके यांना निवेदन देण्यात आले असून आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेचा तपास केज पोलिस करतायत.
No comments