Breaking News

ऊसतोड मजुरांना कारखान्यावर घेऊन जाणारा टेम्पो पेटविलाआष्टी तालुक्यातील धिर्डी जवळील घटना 

के. के. निकाळजे । आष्टी 

पैठण तालुक्यातील  आगर नादड वरून कोल्हापूर येथील पंचगांगा साखर कारखान्यावर ऊसतोड मजुर घेऊन जात असलेला टेम्पो  रविवारी रात्री एका  चारचाकी वाहनातुन आलेल्या अज्ञात  सात ते आठ लोकानी जबरदस्ती करून खाली उतरून हाणमार करून टायरची हवा सोडुन लाईट फोडली व टेम्पो  MH.16, Q 6788 जाळुन देऊन त्यांनी  धूम ठोकली. या प्रकरणी टेम्पो चालक गोरख गुलाब अंगरख रा. खाम पिंपरी वय  29    यांच्या फिर्यादी वरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात लोंकाविरूध्द जाळपोळ, हाणमारीचा गुन्हा सोमवारी सकाळी  दाखल करण्यात आला आहे. 

  

या प्रकरणी घटनास्थळी  अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी भेट दिली. पुढील तपास  सहाय्यक पोलिस निरीक्षक सलीम पठाण पुढील तपास करीत आहेत.


No comments