Breaking News

ऊसतोड कामगार मुकादम यांचे प्रश्न मार्गे लावल्याशिवाय शांत बसणार नाही- आ. सुरेश धस

के. के. निकाळजे । आष्टी

कारखानदारांनी ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या कष्टाचे पाणी करण्याचे आजवर केले आहे. परंतु आता बस झाले, ज्या ऊसतोड मुकादम व कामगारांच्या जीवावर कारखानदारी चालते अशा साखर सम्राटांनी व साखर संघाने संपामध्ये फूट पाडण्याचा कदापी प्रयत्न करू नये कारण तो कधीच यशस्वी होणार नाही.  ऊस तोड कामगार मुकादम यांचे प्रश्न मार्गे लावल्याशिवाय शांत बसणार नाही असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले ते जिंतूर येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ऊसतोड , कामगार मुकादम  यांच्या  चर्चासत्राचे बैठकीत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आ.रामप्रसाद बोर्डीकर,आ.मोहन फड, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम,बंजारा समाज प्रतिनिधी उपस्थित होते

पुढे बोलताना आ. धस म्हणाले की, ऊस तोड कामगार व मुकादम यांचे जे जे प्रश्न आहेत जसे  मजुर वाढ, वाहतूक दरवाढ, मुकादम कमिशन वाढ, मजूर विमा ह्या सर्व गोष्टी कारखान्यास करणे भाग पाडल्याशिवाय शांत बसणार नाही. यासाठी आपल्या सहकार्याची ची अपेक्षा ठेवून तुमच्या सोबत चर्चा करण्यास आलो आहे.

 माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर सेलू मतदार संघात खूपच संख्येने लोक ऊस तोडणी ला जातात हे सर्व निश्चित  तुमच्या पाठीशी राहतील वेळप्रसंगी आंदोलनात ही सहभागी होतील फक्त यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे.असे आवाहन केले 

कार्यक्रमा प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,जेष्ठ नेते बालप्रसाद जी मुंदडा,जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पंडित दराडे ,भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सखाराम राठोड, कैलास महाराज, दत्तात्रय कटारे सुमेध सूर्यवंशी, अमोल देशमुख माधव दराडे ,प्रवीण कांदे, संतोष राठोड ,विकास जाधव, प्रवीण कांदे ,सचिन राठोड व परिसरातील बहुसंख्येने मुकादम उपस्थित होते.


No comments