Breaking News

बर्दापुर घटनेतील आरोपीना तात्काळ अटक करा; अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू - पप्पू कागदे यांचा इशारागौतम बचुटे ।  केज 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर येथील झालेली विटंबनेचा प्रकार हा निंदनीय असून आरोपीना जर तात्काळ अटक केली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे दि. २८ ऑक्टोबर रोजी रात्री महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात माथेफिरूने दगडाने नासधूस करून विटंबना केली आहे. त्यामुळे गावातील वातावरण तणावाचे बनलेे असूूूननल सर्व  यव्यवहार बंद आहेत. पहाटे पासून भिमसैनिक आणि महिला पोलीस स्टेशन मध्ये ठिया देऊन आंदोलन करीत आहेत. 


पप्पू कागदे यांनी बर्दापूर येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी त्यांनी आमदार संजय दौंड व अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांची भेट घेतली आणि प्रशासनाला ईशारा दिला की, या घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून आरोपीना तात्काळ अटक करावी. जर आरोपीना तात्काळ अटक झाली नाही; तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपात आंदोलन कर. तसेच आमची भूमिका ही समतेची व समानतेची असून जो कोणी घटने मागचा माथेफिरू असतील त्यांना माफ करण्यात येऊ नये. तसेच जातीय सलोखा आणि शांतता राखण्याचे आवाहनही पप्पू कागदे यांनी केले आहे. या वेळी त्यांच्या सोबत अविनाश जोगदंड, दिपक कांबळे, सुभाष वाघमारे, दशरथ सोनवणे, दिपक कांबळे, कपिल कागदे, प्रमोद दासुद, वाघमारे,  गौतम बचुटे, गंडले यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments