Breaking News

राष्ट्रीय पत्रकार दिना निमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार

 


गौतम बचुटे । केज  

राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून केज येथे आदर्श पत्रकार संघाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला.

वृत्तपत्र व्यवसायात वृत्तपत्र विक्रेता हा शेवटचा परंतु तेवढाच महत्त्वाचा घटक असला तरी तो उपेक्षितच आहे. म्हणून राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्याचा एक अनोखा कार्यक्रम केज येथील आदर्श पत्रकार संघांच्या वतीने आयोजित केला होता. त्याचाच एक भाग म्हणून यांनी केज येथील वृत्तपत्र विक्रेते सुहास मांडवकर, रामभाऊ कोकीळ, दिलीप गवळी, महेंद्र मस्के, शेख मेहेराज, अविनाश बायस व शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना पुष्गुच्छ व छोटीसी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे यांच्यासह साप्ताहिक केज परिसरचे संपादक सतीश केजकर, धनंजय कुलकर्णी, अशोक सोनवणे, सुहास चिद्रवार, गौतम बचुटे, संतोष गालफाडे, महादेव गायकवाड, दशरथ चौरे, दादासाहेब ढाकणे, अनिल गलांडे, प्रकाश मुंडे, बाळासाहेेेब जाधव, स्वामी हे उपस्थित होते.

दरम्यान यावेळी पत्रकार विक्रेत्यांनी या सत्कार कार्यक्रमांनी भारावून जात कृतज्ञता व्यक्त केली. तर प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

No comments