Breaking News

पोलीसांनी पकडलेला बलात्कारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

शिरूर पोलिसांचे मात्र धाबे दणाणलेशिरूर का. :  चुलत भावाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवून फरार झालेल्या नराधमाला शिरूर कासार पोलिसांनी वडवणी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली असता तो, कोरोना पॉझिटिव्ह  आढळून आल्याने पोलिसांनाचे मात्र धाबे दणाणले आहेत.

शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतचुलत भावाच्या १३ वर्षीय मुलीवर २५ वर्षीय नराधम चुलत्याने बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मात्र फरार झाला होता. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील आरोपीला गजाआड करण्यासाठी शिरूर पोलिसांनी एक पथक आरोपीच्या मागावर होते. 

दरम्यान वडवणी येथे तो नराधम असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार   शनिवारी रात्री शिरूर पोलिसांनी त्या नराधमास ताब्यात घेतले. त्याची अँटीजेन टेस्ट केली  असता तो बाधीत आढळून आला. सध्या त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या संपर्कात आलेल्या पोलिसांचेही आज स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. ही कारवाई पोलिस अधीक्षक आर. राजा रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख सुरेश खाडे, शिरूर पोलिस ठाण्याचे पीएसआय मनोज बरुरे, साळुंके, शेख यांनी केली. 


No comments