Breaking News

युवराज गीते यांना जिल्हाधिकारी यांनी प्रशस्तीपत्र देऊन केला सन्मानगौतम बचुटे । केज   

जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाचे औचित्य साधून लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी कोरना सारखा विषाणुजन्य रोगराईच्या संकटकाळी लातूर येथील शासकीय रक्त पेढी विभागात काम करीत असलेले केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवाशी युवराज गित्ते यांनी केलेल्या विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा आपत्तकालीन व्यवस्थापन प्राधिकरण वतीने जिल्हाधिकार्‍यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे. 

या बाबतची माहिती अशी की, दि.१३ ऑक्टोबर रोजी जागतिक आपत्ती व धोके निवारण दिन साजरा केला जातो. त्या निमित्त जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी युवराज गित्ते यांचा सन्मान पत्र देऊन त्यांचे कौतुक केले आहे.  रक्त पेढी विभागतील वैद्यकीय अधिकारी युवराज गीते यांनी केलेल्या विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा आपत्तकालीन व्यवस्थापन प्राधिकरण वतीने जिल्हाधिकार्‍यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला आहे. सन्मान-पत्रात जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटले आहे की, युवराज गित्ते यांनी रक्तपेढी विभाग लातुर येथे त्यांनी कोरोना महामारीच्या कठीण काळात मोलाची भूमिका बजावली. याचा जिल्हा प्रशासानास सार्थ अभिमान असून भविष्यात अशाच प्रकारची भरीव कामगिरी करण्यासाठी जिल्हा प्राधिकरणा कडून शुभेच्छा दिल्या आहेत.


या बद्दल युवराज गित्ते यांचे साळेगाव येथील गावकरी आणि मित्रमंडळी यांनी कौतुक केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


No comments