Breaking News

मंडप व्यावसायिकांचे केज तहसील समोर उपोषण

 


गौतम बचुटे । केज 

लॉक डाउनमुळे सर्व व्यवसाय आणि कार्यक्रम बंद असल्याने मंडप व्यावसायिक आणि कामगारांची उपासमार होत असल्याने त्यांना शासनाने आर्थिक मदत करून व्यवसायास परवानगी देण्याच्या मागणीसाठी केज तालुक्यातील मंडप व्यावसायिकांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले.

या बाबतची माहिती अशी की, सध्या सर्वत्र लॉक डॉऊनमुळे कार्यक्रमास परवानगी नाही. त्यामुळे मंडप व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले रोजंदारी कामगार यांची व त्यांच्या कुटुंबाची प्रचंड प्रमाणात उपासमार सुरू आहे. या मुळे मंडप व्यावसायिक आणि मंडपाचे काम करणारे मजूर यांना शासनाने आर्थिक मदत करावी. तसेच त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी दिल्यास मंडप व मजुरांच्या हाताला काम मिळेल. या मागणीसाठी केज येथे दि.६ ऑक्टोबर रोजी ११:३० वाजता केज तालुक्यातील सर्व मंडप व्यावसायिक आणि मजूर यांनी लाक्षणिक उपोषण करणार केले. यात अध्यक्ष आजम तांबोळी, भाऊसाहेब राऊत, अरुण हजारे, संजय राऊत, सचिन कावळे, भैय्या जाधव, पिंटू घुले, नामदेव हजारे, प्रेम गायकवाड यांच्यासह केज तालुक्यतील मंडप व्यावसायिक सहभागी झाले होते. दरम्यान उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते प्रा हनुमंत भोसले, सीताताई बनसोड, नासेर मुंडे यांनी भेट देऊन मागण्या संदर्भात कार्यवाहीची मागणी केली. 
No comments