Breaking News

जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या परळी तालुका अध्यक्षपदी केशव कुकडेउपाध्यक्षपदी पत्रकार रानबा गायकवाड तर सचिवपदी कवी अनंत मुंडे यांची निवड

परळी : मराठा सेवा संघप्रणीत जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या परळी तालुकाध्यक्षपदी शिवश्री केशव कुकडे यांची  तर उपाध्यक्षपदी प्रा. सिद्धार्थ तायडे, पत्रकार रानबा गायकवाड   व सचिवपदी  कवी अनंत मुंडे  यांची निवड करण्यात आली. या निवडीचे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड,  जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व इतर समविचारी  कक्षांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

नुकतीच जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेची परळी तालुका कार्यकारणी घोषित करण्यात आली यात उपाध्यक्षपदी प्रा. सिद्धार्थ तायडे, रानबा गायकवाड, कार्याध्यक्ष लक्ष्मण लाड, सचिव अनंत मुंडे, प्रसिद्धीप्रमुख महेश होनमाने, कोषाध्यक्ष संजय अघाव, संघटक गजानन साबळे, समन्वयक प्रियदर्शनी गुणाले, आदींची निवड करण्यात आली आहे.

  जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती डॉ.निर्मलाताई पाटील, प्रदेश सचिव बालाजी जाधव विभागीय अध्यक्ष नागनाथ जाधव, बीड जिल्हा अध्यक्ष विश्वंभर वराट व इतर पदाधिकारी यांच्यात ऑनलाइन  बैठक  संपन्न झाली.  या बैठकीत  जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद परळी  ची कार्यकारणी  निवडण्यात आली. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


No comments