Breaking News

शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार विरोधात परळीत भाजपाच निषेध आंदोलन


परळी : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केंद्र सरकारचे कृषी विषयक ऐतिहासिक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्रह बदल घडवणारे क्रांतीकारक पाऊल उचलले आहे.

परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती आदेश दिले आहेत, यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

म्हणून आज परळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या मा. पंकजाताई मुंडे व भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा मा.खा.डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर स्थगिती आदेशाची होळी करून निषेध नोंदवण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने, ज्येष्ठ नेते श्रीरामजी मुंडे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निळकंठ चाटे यांनी राज्य सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेश चिटणीस जयश्री ताई मुंडे-गीते, प्रदेश कार्यकारिणी सदस्या शालिनीताई कराड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश माने, नगरसेवक पवन मुंडे, पंचायत समिती सदस्य भरत सोनवणे, किशोर केंद्रे, विनायक गडदे, अरुण पाठक, संजय मुंडे, संतोष सोळंके, माऊली साबळे, पिंटू कोपनर, भुराजी बदने, प्रल्हाद सुरवसे, धनराज गीते, योगेश पाडकर, नरेश पिंपळे, गणेश होळंबे, बाळू फड, गोविंद मोहेकर, नारायण तांबडे, धनराज गीते (चांदापूर)भगवानराजे कदम, रमेश पोळ, अनिल माने, रामेश्वर कदम, दीपक गीते, बाळू फुले, श्याम गीते, दीपक नागरगोजे, चैतन्य मुंडे,  राजाभाऊ भांगे, अंगद गंगणे, विष्णुपंत काळे, सोनू मुंडे, राजेंद्र काळे, अमोल वाघमारे व असंख्य भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन चंद्रकांत देवकते यांनी केले तर आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत कराड यांनी मानले.No comments