Breaking News

देवडी येथील युवक शेतकऱ्यांनी केली आत्महत्याजगदीश गोरे । वडवणी


परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात धुमाकूळ घातला होता. या पावसाने खरिप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी अधिकच आर्थिक कोंडीत सापडला. यात अल्पभूधारक शेतकर्‍यांचे जास्तच मरण आले. शेतातील पिकाचे नुकसान झाले आता काय करायचे या नैराश्यातून वडवणी तालुक्यातील देवडी येथील २९ वर्षीय शेतकर्‍याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ०१:०० वाजता उघडकीस आली. 

लक्ष्मण बिभिषन कोल्हे (वय२९ ) रा.देवडी या युवक शेतकर्‍यानी  वडिलांचा मृत्यूनंतर वडिलोपार्जित  शेती कसंन्यास सुरुवात केली होती. शेतामध्ये त्यांनी पिकाची लागवड केल्यानंतर त्यास त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्चही केला होता. तो सर्व खर्च खाजगी सावकाराचे  पैसे घेऊन केला.व मृत वडीलांच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक वडवणी शाखे मधील खात्यामध्ये पैसे असताना व सर्व (मृत्यूप्रमाणपञ, वारसप्रमान प्रञ) या व अधिक कागदपत्रांची पूर्तता करून आणि वृद्ध आईस बँकेमध्ये दोन ते तीन वेळेस नेऊन सुद्धा मुंजोर बँक व्यवस्थापकांनी या मायलेकास तहसील कोर्ट अशा चक्रारा माराव्या लावल्या व तरी सुद्धा मृत वडीलाच्या खात्यावरील पैसे देता येत नाहीत व असे म्हणत दोघांनाही बँकेतून हाकलून दिले.आणि मध्यंतरी परतीचा पाऊस बरसल्याने या पावसाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकर्‍याचे नुकसान झाले. व  कोल्हे याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व आता देणेदाराची देणी व वडिलाचे वर्षश्राद्ध कसे करायचे या विवंचनेतुन त्यांनी दुपारी ०१.००वाजता  विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना कळताच कोल्हे यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार साठी येताना वाटेमध्ये त्याची प्राणज्योत मालवली व रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरनी कोल्हे यांना मृत घोषित केले.No comments