Breaking News

त्या समाजकंटकांला तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करा ― दत्ता वाकसेबीड : बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील पोलिस स्टेशन जवळ असलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी केलीे.

  काल बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहाटे चार ते पाच या सुमारास  समाजकंटकांकडून भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोलिस स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याची विटंबना केली या घटनेचे तीव्र पडसाद बरदापुर व परिसरात उमटले. आंबेडकरांना मानणाऱ्या  नागरिकांनी व नेत्यांनी रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन करून सरकार व पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली या घटनेमुळे आंबेडकरांना मानणाऱ्यात असंतोष पसरला आहे. 

   बर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये  समाजकंटका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र अजूनही  समाजकंटकांचा शोध पोलिसांना लागलेला नाही त्वरित  समाजकंटकांचा शोध न लागल्यास याचा भयंकर परिणाम प्रशासन व शासनास भोगावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

   बर्दापूर पोलीस स्टेशन 24 तास उघडे असताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होतेच कशी? असा सवालही यांनी उपस्थित केला आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणे ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही आणि दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात पुरोगामी सरकार असताना महाराष्ट्रात महापुरुषांची विटंबना होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे .या प्रकरणात बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून त्वरित समाजकंटकांचा शोध घेऊन अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिला आहे.


No comments