Breaking News

शिरूरच्या मुख्य रस्त्यावर गटारीचे पाणी!

 

घाण पाण्यातूनच नागरिकांना करावी लागतेय ये - जा शिरूर का. : येथील शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गटारातील घाण पाणी येऊन रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असून या घाण पाण्यातूनच नागरिकांना ये- जा करावी लागत असल्याने नगरपंचायती विरोधात संताप व्यक्त केल्या जात आहे. 

शिरूर कासार येथील नगर पंचायतीचे नाल्यांच्या साफ सफाई कडे दुर्लक्ष झाल्याने परिणामी शहरातील नाल्या तुंबल्या आहेत. साफसफाई अभावी नाल्याची दुर्गंधी येत असून शहराचा  मुख्य रस्ता असलेल्या ठिकाणी अशाप्रकारे नाल्यातील घाण पाणी येऊ लागल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील घाण पाण्यातूनच नागरिकांना ये -जा करावी लागत आल्याने नगर पंचायतीच्या स्वच्छता विभागा विरुद्ध संताप व्यक्त केल्या जात असून नाल्यांची साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी शिरूरकरांमधून होत आहे. No comments