Breaking News

शौचालयाच्या घोटाळ्यात दोन ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई

नईम अत्तार यांनी वादग्रस्त ग्रामसेवकांचा केला होता भांडाफोड

बाळासाहेब आडागळे । माजलगाव 

तालुक्यातील मौजे लवूळ ग्रामपंचायत येथील स्वच्छ भारत अभियान शौचालय अंतर्गत बांधकाम व अनुदान वितरणामध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी  करून. सदर प्रकरणांमध्ये वादग्रस्त ग्रामसेवक श्री. डी .जे. करे तसेच श्री. थावरे आर. ए. ग्रामपंचायत लवूळ यांनी बहूभूधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना भुमिहिन प्रमाणपत्र देऊन. शासनाची फसवणूक  केली. व अल्पभूधारक नसणाऱ्या कुटुंबाचे स्वच्छ भारत अभियानच्या अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठीचे प्रोत्साहनपर अनुदानाचे प्रस्ताव पंचायत समितीस सादर करून. प्रशासकीय अनियमितता केली आहे. व त्याचा परिणाम आणि वित्तीय अनियमितता झाली आहे. 

त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान मार्गदर्शन सूचना ( ऑक्टोबर २०१७ ) मधील नियम ३ ( १ ) क्र. ६.४.५ चा भंग झाला आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड  श्री.अजित कुंभार  यांनी डी. जे. करे, श्री. थावरे आर. ए. ग्रामसेवक पंचायत समिती माजलगाव वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान वितरण कामात अनियमितता निष्पन्न झाल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याप्रकरणी . डी. जे. करे , थावरे आर.ए. या दोन वादग्रस्त ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश काढून  त्यांना निलंबित केले आहे.

या सर्व प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( गवई गट ) अल्पसंख्यांक विभाग बीड. नईम आत्तार यांनी मौजे लवूळ ग्रामपंचायत येथील स्वच्छ भारत अभियान सौचालय अंतर्गयतत बांधकाम प्रकरणांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला.

 वारंवार पाठपुरावा करून अखेर बकासुर, मुजोर, मग्रूर, भ्रष्ट, वादग्रस्त ठरलेल्या ग्रामसेवकांना अखेर त्यांनी केलेल्या कृत्याचे परिणाम भोगावे लागले असून नईम आत्तार यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे माजलगाव तालुक्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून होते. अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला त्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळाला अशी भावना जनतेतून व ग्रामस्थांमधून ऐकवास मिळत असून. या वादग्रस्त ग्रामसेवकांच्या निलंबनामुळे सामान्य जनतेला न्याय मिळाला असे परिसरातील ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.


No comments