Breaking News

बर्दापूर येथील घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे- पॅन्थर सेनामाजलगाव : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरमध्ये अज्ञात समाजकंटकाने मंगळवारी रात्री  महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली असून त्या मनुवादी जातिवादी विकृत मानसिकता असणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी  ऑल इंडिया पॅन्थर सेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. 

या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना माजलगावच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून  अज्ञात समाज कंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी ऑल इंडीया पॅन्थर सेनेचे भिमराव कदम, सोनाजी घडसे, किरण डोंगरे, विक्रम वाव्हळकर, प्रल्हाद डावरे, राहुल मोरे यांनी केली. No comments