शासकीय कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी : सभापती संभाजी शेजुळ
माजलगाव : तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पादन घेतलेले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. बाजार समितीच्या कार्यलयामध्ये दिनांक 28 ऑक्टोबर पासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून सर्व कापूस उत्पादकशेतकरी बांधवानी सकाळी 10: 30 ते 5:30 पर्यन्त कायलयीन वेळेत शासकीय सुट्या वगळून याचा न नोंदणी करावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शेजुळ यांनी केले आहे.
शासकीय कापूस खरेदी नोंदणीसाठी माजलगाव बाजार समितीच्या कार्यालयात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी सातबारा, पेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक किंवा बीड जिल्हा मद्यवर्ती बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, पासपोर्ट साईज फोटो, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तरी शासकीय कापूस खरेदीसाठी वरील प्रमाणे नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासन व सीसीआय, कॉटन फेडरेशन यांच्यामार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त कापूस खरेदी करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती सभापती संभाजी शेजुळ यांनी सांगितली आहे.
No comments