दरवाढ झाल्याशिवाय यवतमाळ जिल्ह्यातुन एकही उसतोड मजूर जाऊ देणार नाही - आ. निलय नाईक
आष्टी : यवतमाळ जिल्ह्यातून उमरखेड,अरणी,महागाव या भागातून अनेक मजूर ऊसतोडणीसाठी जातात यांच्या मागण्या व अडचणी कारखानदारांनी मान्य केल्या पाहिजेत. मधले राजकीय दलाल करार करतात.मजूर, मुकादम,वाहतूकदार यांचे चाललेले शोषण थांबले पाहिजे.सामान्य मजुरांना आपल्या कामाचा मोबदला दिला पाहिजे. जोपर्यंत कायद्याच्या रूपाने न्याय मिळत नाही तोपर्यंत कडक भूमिका घेणार आहोत. ऊसतोडणी प्रश्नावर आ.सुरेश धस यांनी आवाज उठवला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो जोपर्यंत दरवाढ होत नाही तोपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील एकही मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाही या संपात आम्ही आ. सुरेश धस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे प्रतिपादन आ. निलय नाईक यांनी केले. ते यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आयोजित ऊसतोडणी चर्चासत्रात बोलत होते.
पुढे बोलताना आ. नाईक म्हणाले की,ऊसतोडणी मजूर,मुकादम व वाहतूकदार यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे.
या संपात आ. सुरेश धस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांना आमचा पाठिंबा आहे. सामान्य ऊसतोड मजूर, मुकादम यांच्या बाजूने न्याय हक्क मिळवण्यासाठी कायदा झालाच पाहिजे. तसेच दरवाढही झालीच पाहिजे या अनेक मागण्यांसाठी आ. सुरेश धस यांनी कोरोनाच्या महामारीत देखील सामान्य कामगारांसाठी महाराष्ट्र दौरा काढला आहे. ते सातत्याने झटत आहेत. त्यांच्या आम्ही सोबत आहोत. या भागातून अनेक ऊसतोडणीसाठी मजूर व मुकादम जातात यावर्षी मात्र संपातील मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही मजूर व मुकादम ऊसतोडणीसाठी जाणार नाही असे प्रतिपादन ऊसतोड मजूर, मुकादम,वाहतूकदार यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या महाराष्ट्र दौरात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील आयोजित चर्चा सत्रात बोलताना आ. निलय नाईक यांनी शेवटी सांगितले.
महाराष्ट्र ऊसतोड मजुर,मुकादम,वाहतूकदार यांच्या प्रश्नांवरती सुरु असलेल्या राज्याच्या दौऱ्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आयोजीत चर्चासञात बोलताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर आ.सुरेश धस यांच्यासह यवतमाळ भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आरती पाटील,रुपालीताई,नंदू काळे,दिपालीताई जाधव,धनंजय अञे,भारत पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments