Breaking News

पंकजाताई मुंडे यांच्या वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे : केज तालुका भाजपाची मागणीगौतम बचुटे । केज 

आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत माजी मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद केलेला परत घ्यावा. या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने तहसील कार्यालय केज यांना निवेदन  देण्यात आले. 

या बाबत अधिक माहिती अशी की, सावरगाव येथे दसरा  निमित्ताने भगवान बाबाचे दर्शन घेण्यासाठी लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी रितसर परवानगी घेतली होती. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भगवान बाबा भक्तना सोशल मिडियावर जाहीर आव्हान केले होते की, यावर्षी कोरोना महामारीत प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणीही सावरगाव घाट येथे गडावर येऊ नये. विनाकारण गर्दी करू नये. या वर्षी हा मेळावा ऑनलाइन होणार आहे. घरी राहून दसरा साजरा करावा. घरी रहावे सुरक्षित रहावे;  असे आव्हान केले होते.

तरीही सुडबुद्धीने बीड जिल्हा प्रशासनाने माजी मंत्री पंकजाताई मुंडे सह अनेक भगवान भक्तवर गुन्हा नोंद केला. तो तात्काळ परत घ्यावा. या मागणीसाठी केज तालुका भाजपच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जि.प.सदस्य विजयकांत मुंडे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे  रमाकांत मुंडे, महादेव सुर्यवंशी, डॉ. वासुदेव नेहरकर, संतोष देशमुख, धनंजय घोळवे अतुल इंगळे , राहुल गदळे, अशोक वाघमारे, दिनकर चाटे, मचिद्र जोगदंड, शेषेराव कसबे, बालासाहेब मुळे, सुरेश नादे, महादेव अंगद मुळे, तांबडे, सोनू सावंत ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारने पंकजाताई मुंडे यांच्या वरील गुन्हा मागे न घेतल्यास यापुढे चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी दिला आहे.No comments