Breaking News

गोपाळ आंधळे यांचे संपर्क कार्यालय नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे ठिकाण-शकिल कुरेशीप्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी साजरी

परळी : प्रभाग क्र.पाच चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी आपल्या प्रभागात नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरु केलेले संपर्क कार्यालय हे नागरीकांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शक केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष शकिल कुरेशी यांनी केले.प्रभाग क्र.5 संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम व शितल चांदण्यात दुध वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

संत सावतामाळी मंदिर परिसरात तुळजाभवानी मंदिर समोर प्रभाग क्र.5 चे नगरसेवक गोपाळ आंधळे यांच्या संपर्क कार्यालयाचे काल दि.30 ऑक्टोबर रोजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी यांच्या हस्ते व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अभयकूमार ठक्कर, माजी उपनगराध्यक्ष आय्युब पठाण, माजी सभापती विजय भोयटे, जनक्रांती संघटनेचे नेते सचिन लगड, पञकार धिरज जंगले, अनंत कुलकर्णी, रायुकॉचे रामदास कराड, बळीराम नागरगोजे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हे संपर्क कार्यालय या भागातील नागरीकांसाठी हक्काचे ठिकाण झाले असल्याचे शकिल कुरेशी यांनी सांगितले तर नगरसेवक गोपाळ आंधळे हे नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात या संपर्क कार्यालयामुळे नागरीकांना अनेक योजनांची माहिती व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत मिळणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, अभयकुमार ठक्कर यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. 

प्रभाग क्र.5 च्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजनाचे आयोजन करुन उपस्थित नागरिकांना चंद्राच्या शितल चांदण्यात दुध वाटप करण्यात आले.यावेळी हनुमान आगरकर,अर्जुन साखरे, बालाजी दहिफळे, ज्ञानेश्वर होळंबे, भागवत गित्ते, जेष्ठ सामाजिक नेते भाऊशा कदम, जोगदंड मामा, रावसाहेब आंधळे, मोहन साखरे, नन्नू लोखंडे, किशनराव लोखंडे, मुकूंद आंधळे, धनंजय गाडवे, महेश घेवारे यांच्यासह प्रभाग पाच मधील नागरीकांची उपस्थिती होती.


No comments