Breaking News

शिवसंग्रामच्या दणक्याने तेलगाव नाक्यावर पाणी साचणाऱ्या सर्व ठिकाणी नगरपरिषदेने मुरूम टाकला


मुरुमाची मलमपट्टी नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजना करा - लाला शेख

बीड :  शिवसंग्रामकडून सातत्याने नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराबाबत आंदोलने करण्यात येत असल्याने नगरपरिषद हरकतीत आली आहे. तेलगाव नाका भागात पावसाचे पाणी कमरेपर्यंत साचत असल्याबाबत वारंवार नगरपरिषदेच्या निदर्शनास शिवसंग्रामने आणून दिले आहे. मात्र स्थानिक आमदार असलेले क्षीरसागर व नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष हे सर्व आश्वासनाशिवाय दुसरे काहीही करत नसल्याने कमरेपर्यंतच्या पाण्यात चप्पू चालवत शिवसंग्रामच्या लाला शेख यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला होता.


 

 राज्यभर या आंदोलनाची चर्चा झाली. बीडचे चिखलबीड अन आता जलबीड झाल्याचे संपूर्ण राज्याने पाहिले. यामुळे हरकतीत आलेल्या नगरपरिषदेकडून या भागातील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचते त्या त्या ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र मुरूम टाकणे हे मलमपट्टी करण्यापुरते असून कायमस्वरूपी तोडगा काढावा, मुरुमाच्या टेंडरपायी बीडकरांचे हाल क्षीरसागरांनी थांबवावे असे शिवसंग्रामचे विभागप्रमुख लाला शेख यांनी म्हंटले आहे. किती वर्ष मुरुमांवर भागवायचे असेही त्यांनी यावेळी म्हंटले.   No comments