Breaking News

भक्ताने पोलिसाला केली मारहाण

 


बीड : दर्शन घेण्यासाठी मंदिरात का जाऊ देत नाहीत, असं म्हणत एका भक्ताने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचे गच्चूरे धरून चापटा मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना सावरगाव घाट (ता. पाटोदा) रविवारी (दि.२५) घडली. याप्रकणी आरोपी भक्ताविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

कोविड - १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून राज्यात नव्हे तर देशात मंदीर बंद आहेत. आशा स्थितीत रविवारी विजया दशमी साजरी होत असताना महाराष्ट्रात ही विविध पक्षांचा दसरा मेळावा पार पडला. संत भगवानबाबा यांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबा यांचे दर्शन घेऊन याठिकाणी  ऑनलाईन दसरा मेळावा घेणार असल्याने इथं पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मात्र असं असताना भगवानबाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी का जाऊ देत नाही, असे म्हणत गणेश खाडे (रा. रोहितळ, ता. गेवराई) याने कर्तव्यावर असलेले पोहेकॉ संतोष काकडे यांच्याशी हुज्जत घातली. पोहेकॉ काकडे यांनी गणेश खाडेला मंदिरात जाण्यास मजाव केल्यानं संतापलेल्या गणेशने पोहेकॉ काकडे यांच्या गच्छीला पकडून चापटाने मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी पोहेकॉ संतोष काकडे यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलिस ठाण्यात गणेश खाडे याच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे. तसेच कोविड- १९ हा साथ रोग पसरवण्याचा धोका असताना धोकादायक हयगयची घातक प्रवृत्ती करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि शिरसठ करत आहेत. 

  


No comments