Breaking News

फयाज कुरेशींच्या मागणीला यश

जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना दिली सायंकाळी 9 पर्यंत परवानगी

बीड :  मागील 6 महिन्यापासून कोविड-19 या आजारामुळे छोटे व मोठे व्यापार्‍यांची अवस्था हलाकीची झालेली होती. दरम्यान नागरीकांसह व्यापार्‍यांची मोठी कोंडी झाल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत व्यापार्‍यांची दुकाने उघडे ठेवावेत अशी मागणी फयाज कुरेशी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेत व्यापार्‍यांना रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान या निर्णयामुळे व्यापार्‍यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे व जिल्हाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.
व्यापारी संघटनेचे उगवते नेतृत्व फयाज कुरेशी नेहमी व्यापार्‍यांच्या अडीअडचणीसाठी अहोरात्र कष्ट घेत असतात. मागील अनेक दिवसांपासून कोविड-19 मुळे व्यापार्‍यांच्या अडचणी वाढल्या होत्या. अचानक केले जाणारे लॉकडाऊन, संचारबंदी तसेच व्यापार्‍यांना केले जाणारे नाहक दंड या विरोधात फयाज कुरेशी मैदानात उतरले होते. फयाज कुरेशी यांच्या दखलपात्र कार्यामुळे ते व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय झाले होते. फयाज कुरेशी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीकडे जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने लक्ष देऊन व्यापार्‍यांना न्याय देण्याचे काम केले आहे.


No comments