Breaking News

खळवट लिमगावकरांचे प्राण वाचवायचे असतील तर गाव ते शेती पूल करा-दत्ता वाकसेबीड : गेल्या दोन चार दिवसापूर्वी वडवणी तालुक्यातील खळवट लिमगाव येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीचा गावातून शेतामध्ये जाण्याच्या रस्त्यामध्ये तलाव आहे त्या तलावाच्या पाण्याच्या प्रवाह मधून होडीच्या साह्याने शेतकरी हे प्रवास करून आपापल्या शेतात जात आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते शेतकरी होडीच्या साह्याने  तो तलाव पार करून जात  असतात  त्याच होडीतून प्रवास करताना तेथील शेतकरी कुटुंबातील दोन व्यक्ती पाण्यामध्ये बुडवून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्याच पार्श्वभूमीवर आज धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी बीड उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची भेट घेऊन त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या व्यथाच मांडल्या.

 त्याप्रसंगी त्यांना निवेदन देखील सादर केले आहे त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे की खळवट लिमगाव येथील गाव ते शेती पूल तास काम मंजूर करून त्याठिकाणी होत असलेली जीवित आणि तात्काळ थांबावे त्याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना होडीच्या माध्यमातून  ये-जा करावी लागत असते त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे वेळोवेळी शासन प्रशासन स्थानिक आमदार यांच्याकडे तेथील शेतकऱ्यांनी पूल करण्याच्या पूल संदर्भामध्ये मागणी केलेली आहे परंतु या मागणीला कुठेतरी दुजोरा दिला जात आहे त्यामुळे आगामी काळामध्ये काही जीवितहानी झाली तर  त्याला शासन-प्रशासन जबाबदार असेल त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या व्यथा या खूप दुखतय असून त्यांना तात्काळ त्या ठिकाणी गाव ते शेती पूल मंजूर करून न्याय द्यावा असे देखील दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

बीडचे उपजिल्हाधिकारी संतोष राऊत हे देखील त्याठिकाणी गहिवरून गेले ते म्हणाले की लवकरच या प्रश्न आमच्या वरिष्ठांना कळवून त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू ते म्हणाले घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे शासनाच्या वतीने लवकरच या ठिकाणी दखल घेतली जाईल असे देखील म्हणाले.No comments