Breaking News

तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी पदभार स्विकारला

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे-तहसिलदार राजाभाऊ कदम

के. के. निकाळजे । आष्टी

कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून,आष्टी तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी घाबरून न जाता स्वत;ची व कुटूंबाची काळजी घेउन सरकारच्या माझे कुटूंब,माझी जबाबदारी चे पालन करण्याचे अहवान तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी केले.

           

आष्टी तहसिलदार पदाचा आज दि.8 रोजी दुपारी 3 वाजता राजाभाऊ कदम यांनी पदभार स्वीकारला यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने त्यांचा छोटेखानी स्वागता उत्तर देतांना तहसिलदार कदम बोलत होते.यावेळी समाजसेवक विजय गोल्हार,जेष्ठ पञकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे,उत्तम बोडखे, मनोज पोकळे, नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे,नायब तहसिलदार निलीमा थेऊरकर,आष्टी तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष भिमराव गुरव,शरद तळेकर,अव्वल कारकुन भगिरथ धारक,शरद शिंदे,आर.ए.पवार यांच्यासह उपस्थित होते.पुढे बोलतांना तहसिलदार कदम म्हणाले. दिवसेंदिवस कोरोनाने ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात काळजी घेणे गरजेचे आहे.तसेच राज्य शासनाने माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवली असून,तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांनी ही मोहिम हाती घेऊन तालुक्यातून कोरोना हद्दपार करावा असे अहवान नवनिर्वाचित तहसिलदार यांनी पञकारांमार्फत केले आहे.


No comments