Breaking News

निगरगठ्ठ लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु करत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही - माजी नगरसेवक दत्ता गायकवाडसामान्य बीडकर, व्यापाऱ्यांनी उस्फुर्त उपस्थिती दर्शवत आंदोलन आपल्या हाती घेतले


क्षीरसागरांनी स्वार्थासाठी काय पत्रकबाजी, भांडणे खेळायची आहेत ती बंगल्यातच खेळावीत; सर्वसामान्य बीडकर व व्यापाऱ्यांची होणाऱ्या त्रासातून सुटका करावी - शिवसंग्राम  

दुसऱ्या दिवशीही जाणीवपूर्वक रखडवलेली रस्ताकामे तात्काळ सुरु कारण्यासाठी शिवसंग्रामचे उपोषण सुरूच

बीड :  अजून किती दिवस अन्यायाला सहन करायचे?  बीडकरांनो उठा ... जागे व्हा .. किती दिवस त्रास सहन करायचा? असे म्हणत शिवसंग्राम व बीडकरांच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशीही भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना साक्षी मानून हिरालाल चौक येथे जाणीवपूर्वक रोखलेल्या रस्त्याची कामे तात्काळ सुरु करा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे. स्वार्थासाठी, हिस्स्यासाठी रस्त्यांच्या कामांना बोगसगिरीचे नाव देऊन जाणीवपूर्वक थांबवले गेले आहे. हे सर्व हिस्स्यांसाठीची भांडणे बीडकरांच्या जीवावर उठत आहेत, बीडकरांचे जगणे मुशकील झाले आहे. रस्त्याचे काम सुरु करायचे सोडून पत्रकबाजी करत शहरातील नागरिकांना मिसगाईड करण्याचे काम क्षीरसागरांनी सुरु केले आहे. क्षीरसागरांनी स्वार्थासाठी काय भांडणे खेळायची आहेत ती बंगल्यातच खेळावीत; सर्वसामान्य बीडकर व व्यापाऱ्यांची होणाऱ्या त्रासातून सुटका झालीच पाहिजे अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे.

शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यांची तात्काळ कामे सुरु करा, जे कुणी रस्त्याचे कामे अद्वैत त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे नोंदवा, नगरसेवक कामे अडकत असतील तर डिसक्वालिफाय करा असे सक्त आदेश मुख्याधिकाऱ्यांना देऊनदेखील शहरातील कामे थांबलेलीच आहेत. 

आज दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरु असून सामान्य बीडकर, व्यापाऱ्यांनी उस्फुर्त उपस्थिती दर्शवत आंदोलन आपल्या हाती घेतले आहे.  हरातील निगरगठ्ठ लोकप्रतिनिधी, मुख्याधिकारी जोपर्यंत रस्त्याचे काम सुरु करत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते शिवसंग्राम पेठ बीड विभागप्रमुख तथा माजी नगरसेवक दत्ता गायकवाड यांनी घेतली आहे. यावेळी शिवसंग्राम कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  No comments