Breaking News

इंदिराजी गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना माजलगाव कॉंग्रेसच्या वतीने अभिवादनकॉंग्रेस पक्षाने पाळला किसान अधिकार दिवस 

माजलगाव : माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभाग व कॉंग्रेस कमिटी शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी व स्वर्गीय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती चे औचित्य साधुन राज्यभरात सत्याग्रह आयोजित करून केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी किसान अधिकार दिवस आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास लक्ष केंद्रित करून जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभाग व माजलगाव शहर कॉंग्रेस शाखेच्या वतीने मा .पंतप्रधान इंदिराजी गांधी व सरदार वल्लभ भाई पटेल यांना संयुक्तरित्या अभिवादन करून , यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार विरोधी कायद्याला विरोध दर्शऊन जिल्हा कॉंग्रेस अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या नेतृत्वात किसान अधिकार दिवस पाळण्यात आला. यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु. जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे , शहरअध्यक्ष शेख रशीद, शेख अहमद, शेख जानूशहा, श्रीनिवास शेळके, अफरोज तांबोळी, अभिजित देडे, संकेत कासार , राहुल कांबळे , विश्वा कांबळे , क्रुष्णा शिंदे , अमोल गावडे , विनोद मेंडके , किरण कांबळे सह कॉंग्रेस कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


No comments