Breaking News

हाथरस प्रकरणी केज येथे रिपब्लिकन श्रमिक सेनेची निदर्शनेगौतम बचुटे । केज 

उत्तर प्रदेशात हाथरस येथे मनीषा वाल्मिकी हिच्यावर झालेल्या अन्याया प्रकरणी केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संलग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात सर यांच्या नेतृत्त्वाखाली केज तहसील समोर येथे निदर्शने करण्यात आली. तसेच केज तालुक्यातील जानेगाव येथील मागासवर्गीय महिला सरपंच यांच्या पतीवर झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणी गुन्हेगारास पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी यात करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे वाल्मीकी समाजातील मनीषा वाल्मीकी या १८ वर्षीय युवतीवर चार नराधमांनी बलात्कार करून तिची जीभ छाटली आणि पाठीचा मणका मोडला. यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या जातीयवादी नराधमांना कठोर शासन करून उत्तर प्रदेशचे योगी सरकार बरखास्त करण्यात यावे. या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संलग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांच्या आदेशा नुसार जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खरात यांच्या नेतृत्वाखाली केज येथे तहसील कार्यालया समोर दि. ३ ऑक्टोबर रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध नोंदवित उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. 


तसेच केज तालुक्यातील जानेगाव येथे मागासवर्गीय महिला सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांची पती विकास ओहाळ यांच्यावर गावातील गाव गुंडांनी  धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांच्या छातीवर चाकूचे वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांची भूमिका संदिग्ध असून त्यांनी धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला असताना देखील हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल न करता; हल्लेखोरांना वाचविण्यासाठी  थातूरमातूर गुन्हे दाखल केले आहेत. त्या मुळे या प्रकरणी संबंधित युसूफवडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनाही सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी  करण्यात आली आहे. निवेदनावर चंद्रकांत खरात यांच्यासह रमेश निशिगंध, सर्जेराव शिंगारे, अशोक तुपारे, सुमित उजगरे, हिरवे, अविनाश खरात, अनील शिनगारे,  आश्रुबा सरवदे, महादेव आडे आणि भीमा शिनगारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. घोषणाबाजी करून निदर्शने केल्या नंतर  नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.No comments