Breaking News

दुचाकीचोरला ठोकल्या बेड्या : चोरीच्या ९ गाड्या केल्या जप्त, परळी पोलिसांची कामगिरी

 


परळी :
दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यात परळी पोलिसांना यश आले असून दुचाकीचोरट्या कडून ९ गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. ही कारवाई परळी पोलिसांच्या दरोडा प्रतिबंधक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली. 

मिळालेल्या माहितीनुसार परळी येथील तहसिल कार्यालयाच्या समोरील मैदानावरुन शेख शाहेद शेख वाहेद यांची दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या चोरीच्या घटनेचा पोलीस तपास करत असताना खबऱ्या मार्फत गुप्त माहिती मिळाल्या नंतर एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता दुचाकीची चोरी करत असल्याचं त्यानं मान्य केलं. 

आरोपी राजाभाऊ रतन ताटे (रा. मरळवाडी, ता. परळी) हा दुचाकीचोर बीड जिल्ह्यास नाशिक, जळगाव, पुणे यासह अन्य जिल्ह्यातून त्यानं दुचाकींची चोरी करून त्याची विक्री केल्याचं कबूल करत त्या विक्री केल्याचं पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं काही चोरीच्या गाड्यांना ग्राहक मिळालं नसल्याने मरळवाडी येथील झाडा झुडपात त्या लपवून ठेवल्या असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या चोरीच्या ९ गाड्या यावेळी हस्तगत केल्या असून सुमारे ३ लाख ६० हजार किंमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई पोलीस अधिक्षक आर. राजा स्वामी, पोलीस उपधिक्षक जायभय, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सपोनि प्रदीप एकसिंगे, पोहेकॉ भास्कर केंद्रे, पोहेकॉ तोटेवाड, पोहेकॉ घुमरे, पोहेकॉ चव्हाण, पोना हनुमान मुंडे, सुंदर केंद्रे, पोशि गोविंद भताने, पोशि शंकर बुट्टे, अन्नमवार यांनी केली. 


No comments