Breaking News

अपघाती निधन झालेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबाला आमदार आजबे यांनी केली आर्थिक मदत


आमदार बाळासाहेब आजबे यांनी निवडणुकीतील शब्द पाळला

शिरुर कासार : तालुक्यातील बडेवाडी येथील शेतकरी अजिनाथ बडे यांचा विद्युत तारेचा शॉक लागून वर्षभरापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्या वेळी आमदार बाळासाहेब आजबे हे निवडणूक प्रचार दौऱ्यावर असताना त्यांनी बडे कुटुंबियांना सांत्वनपर भेट दिली होती.

 या वेळी त्यांनी सदरील कुटुंबाला आपल्या वतीने आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. आमदार बाळासाहेब आजबे हे शिरुर तालुकाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी बडेवाडी येथे जाऊन सदरील कुटुंबाची भेट घेतली आणि रोख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश कुटुंबियांकडे सुपूर्द केला. बाळासाहेब आजबे यांनी मयताच्या वारसांना मदत करेल असा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, तहसीलदार श्रीराम बेंडे, तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, सतिष बडे, रवी आघाव, बाबुराव झिरपे, नशीर शेख, भीमराव गायकवाड, अमोल चव्हाण, सावता कातखडे धर्मा जायभाये, सुभाष यमपुरे, दादा सवासे, कल्याण पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments