Breaking News

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणात पुन्हा धोका होण्याची शंका- आ विनायक मेटे

मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन सुनावणीबाबत नियोजन करावेबीड : मराठा आरक्षण स्थगिती संदर्भात येत्या 27 तारखेला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होत आहे. ही सुनावणी ज्या खंडपीठाने मराठा आरक्षणाला मागच्यावेळी स्थगिती दिली होती त्याच खंडपीठासमोर होत आहे.
     
याचा अर्थ 'ही सुनावणी सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते की काय असं अशी मराठा समाजाच्या मनात शंका आहे, सरकारच्या व अशोकराव चव्हाण यांच्या समितीच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आलेली आहे. यामुळे याला राज्य सरकार जबाबदार आहे. असा घणाघाती आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षणाची केस पुढे येत आहे. त्यामुळे यात काय बरंवाईट झालं तर मराठा समाजाच्या आरक्षणाला ठाकरे सरकार, मंत्री अशोकराव चव्हाण जबाबदार असतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून मराठा आरक्षणासंदर्भात परत एकदा बैठक बोलावून घेत याबाबत मराठा समाजाच्या बाजूने कसा निकाल येईल यासंदर्भात नियोजन करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.
No comments