Breaking News

शंभू देसाई व नरेंद्र पाटील यांच्या वर कारवाई करा :-ऑल इंडिया पँथर सेना

 


के. के. निकाळजे। आष्टी   

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर सातत्याने जनहिताचे काम करत आहेत, हे काम करताना जबाबदार पदावर असणारे शम्भू देसाई, नरेंद्र पाटील, यांनी बाळासाहेबांवर अत्यंत नीच दर्जाच्या टीका सोशल मिडिया वर पोस्ट केल्या, यामुळे त्यांच्या वर लवकरात लवकर कारवाई करन्यात येउन राजीनामा घेन्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आष्टी तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.   

या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेना आष्टी तालुक्याचे वतीने  जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे आष्टी तालुका अध्यक्ष शिशुपाल साळवे, तालुका उपाध्यक्ष संतोष थोरात, संदेश निकाळजे, रोशन शिंदे, शुभम शिंदे, कुणाल निकाळजे, सचिन कांबळे , शाम कांबळे हे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. 


No comments