कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करून नवरात्र उत्सव साजरा करा - विजय लगारे
१७ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत असून या काळात सार्वजनिक मंडळा करता चार फूट मूर्ती व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फूट असावी, पारंपारिक मूर्तीऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची अथवा पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरीच करावे, घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास विसर्जन स्थळी स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा, वर्गणी स्वच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे, तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी, माझे कुटुंब माझे जबाबदारी या मागणीबाबत देखील जनजागृती करण्यात यावी, गरबा-दांडिया व इतर संस्कृती कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी आहे. त्या ऐवजी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे, आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनि प्रदूषण संदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करावे, देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक द्वारे देण्यात बाबत जास्त जास्त व्यवस्था करण्यात यावी.
प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकासाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे असे आवाहन विजय लगारे यांनी केले.या बैठकीला उपविभाग पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे , सपोनि भरत मोरे,सलीम पठाण ,सुनील रेडेकर, अनिल ढोबळे, अनंतदेवा जोशी ,मनोज सुरवसे, सोपान पवार, बापुराव गुरव, घनश्याम खाडे, तात्यासाहेब कदम, प्रफुल्ल शहस्त्रबुद्धे, अविनाश कदम, जावेद पठाण, प्रविण पोकळे, संतोष नागरगोजे यांच्यासह पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments