Breaking News

आ. प्रकाशदादा सोळंके यांनी क्रिडांगणा संदर्भात घेतली वडवणी तहसिलमध्ये अधिकाऱ्यांची बैठक
नगरपंचायत मुख्यधिकाऱ्याला घेतले फैलावर

जगदीश गोरे । वडवणी

वडवणी तालुक्यातील तहसिलदार, क्रिडाधिकारी सह सर्व अधिकाऱ्यांची आज सकाळी माजलगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी वडवणी तालुक्याला क्रिडांगण असावे म्हणून महत्वपूर्ण बैठक घेतली.   

                                

            या बाबत सविस्तर वृतांत असा की, वडवणी तालुक्यात विविध शासकिय कार्यालय आहेत पण तालुका क्रिडाधिकारी यांचे कार्यालय व या क्रिडांगणासाठी प्रशस्त मोठया प्रमाणात जागा आवश्यक आहे त्यासाठी आज दि.१६.१०.२०२० रोजी वडवणी तहसिल कार्यालय येथे तहसिलदार,नगरपंचायतचे मुख्याधिकारी, गटशिक्षाणाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, सह सर्वच अधिकारी उपस्थित होते यावेळी वडवणी नगरपंचायत अंतर्गत अंदाज पञाका मध्ये जुन्या नळ धारकासाठी तरतुद का नाही असे विचारले तरतुद नसेल तर २२००/ रु.पेक्षा कमी पैसे घ्या असे सांगितले व कायदेशिर बाबीची पुर्तता करा असे ही आमदार सोळंके यांनी सांगितले, त्यानंतर वार्डात नळ पाईपलाईन झाल्याने रस्ते पूर्ण विद्रूप झाले आहेत तेही सिमेंट रस्ते करा असेही म्हटले आहे.

 नगरसेवक आळणे, नहार, बडे, कुरेशी, यांनी वार्डातले विविध प्रश्न उपस्थित केले तसेच वडवणी तालुका वकिल संघाचे निवेदन दिले त्यानंतर नवीन कोर्ट इमारती मध्ये लाईट व फर्निचरचे  टेंडर तात्काळ काढा असे ही संबंधीत अधिकाऱ्यांना आमदार सोळंके यांनी आदेश दिले, त्या नंतर नियोजित तालुका क्रिडांगणासाठी जागेची पहाणी करण्यासाठी माजी सरपंच गंपू पवार, पंजाबराव शिंदे, बाबुशेठ नहार, संभाजी शिंदे, नवनाथ म्हेत्रे, दिनेश मस्के, बजरंग साबळे, सतिष बडे, लक्ष्मणराव आळणे, अस्लम कुरेशी, विठ्ठल भुजबळ, अॅड.भास्कर उजगरे, श्रीराम मुंडे, संतोष पवार, लहुशेट टकले, दत्ता करांडे, संतोष कदम, सुभाष सावंत, बंटी गायकवाड आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments