Breaking News

शिवसंग्राम आणि मराठा समाजाच्या मागणीची उपमुख्यमंत्री अजित दादांनी घेतली दखलसारथीला स्वायत्तता प्रदान; समाजाच्या वतीने मनापासून आभार - आ. विनायक मेटे


मुंबई  : छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेली सारथी संस्था हि या सरकारच्या काळातील काही लोकांनी जाणीवपूर्वक बंद पाडण्याचे काम केलेले होते. सुदैवाने माननीय उप मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही संस्था सुरु करण्याकरिता पाऊले उचलली आणि त्यानुसार काल त्यांनी बैठक घेतली. बैठकीमध्ये त्यांनी स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय घेऊन सारथीला जिवनदान देण्याचे काम केलेलं आहे.
    

शिवसंग्राम व विविध संघटना, पदाधिकाऱ्यांकडून सारथी संस्था वाचविण्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. यामध्ये सारथी संस्थेंच्या सायत्ततेसाठी, प्रश्नांसाठी रस्त्यावरचा संघर्ष, विधिमंडळ ते देशाची राजधानी दिल्लीपर्यंत आंदोलनात सहभाग असा लढा दिला आहे. काल घेतलेला निर्णय समाधानकारक आहे. सारथीसाठी संघर्ष, आंदोलने, निवेदने,  विविध बैठका, उपोषणे केलेली आहेत,  ते सर्व सार्थकी लागताना दिसते असल्याचे शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटले आहे.  

ते पुढे म्हणाले कि, तारादूत सारखे प्रकल्प असतील, त्यांना पगार देण्याचे काम, ३८ कोटी रुपयांचा निधी देण्याचे काम, शिष्यव्रती देण्याचे काम व अनेक प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याचे काम मा.अजितदादांनी शासन निर्णय घेऊन केलेले आहे. मी अजित दादांचे शिवसंग्राम व मराठा समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो व आभारसुद्धा व्यक्त करतो. मी एवढीच विनंती करतो की, पुढच्या काळात देखील या संस्थेला अशीच उर्जित अवस्था येण्यासाठी असेच प्रयत्न करत राहावे. 


No comments