आई जगदंबे, कोरोना मुक्तीचा आशिर्वाद द्या-नारायण सातपुते
परळी : राज्यात हळुहळु कोरोना रूग्ण संख्या कमी होत चालली असून हा नवरात्रीच्या पार्श्वभुमीवर आई जगदंबेचा आशिर्वादच आहे. एवढ्यावरच न थांबता आई जगदंबे आम्हाला पूर्ण कोरोना मुक्तीचा आशिर्वाद दे अशी प्रार्थना वैद्यनाथ बॅंकेचे संचालक नारायण सातपुते यांनी केली.
भवानीनगर दुर्गोत्सव मंडळ येथे आज पाचव्या माळीला आई जगदंबेची आरती वैद्यनाथ बॅंकेचे संचालक नारायणराव सातपुते व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निलावती सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विधीवत पुजा आणि आरती संपन्न झाली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना आई जगदंबेकडे नारायणराव सातपुते यांनी कोरोना मुक्तीचा आशिर्वाद द्यावा अशी प्रार्थना केली. यावेळी भवानीनगर दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भोजराज पालीवाल यांच्यासह विविध व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माऊली फड, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जगन्नाथ साळुंके, जेष्ठ नेते रविंद्र परदेशी, बद्रीनारायण बाहेती, गजराज पालीवाल, संदीप चौधरी, हरिष पालीवाल, विजय जाधव, पिंपळे यांच्यासह भाविक भक्तांची उपस्थिती होती.
No comments