Breaking News

पप्पू कागदे हे आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक देणारे तरुण नेतृत्व !युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदेंच्या फोनने ७५ वर्षीय उत्तम अप्पा भावनिक झाले !

गौतम बचुटे । केज  

केवळ दलित अन्याय अत्याचार आणि नामांतर चळवळीसाठी सरकारी नौकरील लाथ मारून रामदास आठवले यांच्या सोबत त्या काळी दलित पँथर चळवळीत स्वतःला झोकून देणारे ७५ वर्ष वयाचे उत्तम अप्पा मस्के एक केज शहर आणि तालुक्यातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. उत्तम अप्पा मस्के हे केज परिसर आणि तरुण कार्यकर्त्यात 'आप्पा' नावानेच ओळखले जातात. या पंचाहत्तरीच्या वयातही अप्पा रिपाइंचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा सल्लागार म्हणून काम करीत आहेत. त्यांचा उत्साह खूप दांडगा आहे.

असेच एके दिवशी दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:०० वा. उत्तम अप्पा मस्के हे त्यांच्या नित्याच्या सवई प्रमाणे शहरातून फेरफटका मारून केज-बीड मेन रोडबरील तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन नजीक असलेल्या पत्रकार महादेव गायकवाड यांच्या टायर पंक्चरच्या दुकाना समोर एका बेंचवर बसले होते. त्यावेळी रिपाइंचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांचा केज तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे यांना फोन आणि अपेक्षित त्यांनी अप्पा यांची चौकशी सुरू केली योगायोगाने अप्पा व भास्कर मस्के उपस्थित होते त्याच वेळी पप्पू कागदे यांचे विश्वासू सहकारी तथा बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांचा गौतम बचुटे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. त्यांनी अप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली. योगायोगाने अप्पा त्या वेळी गौतम बचुटे त्यांच्या सोबत उपस्थित होते. हे माहीत होताच किशन तांगडे म्हणाले की, "फोन अप्पांकडे द्या." असे म्हणून सांगितले आणि त्यांना कागदे साहेब बोलणार आहेत; असे म्हणाले. त्या नंतर अप्पा आणि कागदे साहेब यांच्यात १५-२० मिनीटे बोलणे झाले. त्यात काही वैक्तिक ख्याली-खुशाली व पक्षांच्या संदर्भात चर्चा होती. बोलणे झाल्या नंतर मात्र अप्पा हे काहीसे भावुक झाल्याचे दिसले. त्यानी आपल्या डोळ्यावरील चष्म्या काढून रुमालाने चेहरा पुसला. अप्पांचा आवाज थोडासा कापरा झालेला वाटला. त्या नंतर उपस्थित असलेले पत्रकार धनंजय कुलकर्णी आणि इतरांशी बोलताना अप्पा म्हणाले की, "मी आजपर्यंत ताठ मानेने स्वाभिमानाने आणि प्रामाणिकपणे जीवन जगत आलो आहे. एकवेळ जेवणाची भ्रांत असली तरी चिंता नाही. परंतु हीच माझी आयुष्याची खरी कमाई आहे. या मुळे माझी सर्वजण दखल घेऊन मला मान सन्मान देत आहेत. म्हणून मी वयाच्या पंचाहत्तरीतही एकदम ठणठणीत आहेत."

या वेळी आम्हाला पप्पूजी कागदे आणि जेष्ठ उत्तमराव आप्पा यांच्यातील ऋणानुबंध आणि प्रेम पाहायला मिळाले. एक पंचाहत्तरी पार केलेले आप्पा की, ज्यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जिल्हा परिषदेच्या सरकारी नौकरीला लाथ मारून दलित चळवळीत झोकून दिले. आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सामाजिक अन्याय अत्याचाराला तीव्र विरोध केला. नामांतर चळवळीत सर्वस्व पणाला लावले. त्या आप्पांना युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांचा साधा फोन केला तर अप्पा किती भावना विवश होतात आणि पप्पू कागदे हे कुणालाही न विसरणारे युवकांचेच नव्हे तर तमाम आंबेडकरी चळवळीतील व दलितांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे नेतृत्व आहे. 

पप्पू कागदे यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तसेच बीड जिल्ह्यात त्यांच्या खांद्याला खांदा देऊन लढणारी त्यांची टीम राजू जोगदंड, गोवर्धन वाघमारे, किशन तांगडे, किशोर कांडेकर, सचिन कागदे, अविनाश जावळे, अशोक साळवे, अरुण भैय्या निकाळजे, दिपक कांबळे, महादेव उजगरे, दशरथ सोनवणे, डॉ. नरेंद्र जावळे, अरुण भालेराव यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे.


No comments