Breaking News

महावितरण कंपनीस ग्राहकांनी सहकार्य करावे -उपकार्यकारी अभियंता सुहास मिसाळबाळासाहेब आडागळे ।  माजलगाव 

ग्रामीणांतर्गत असणाऱ्या मनुर व मनुरवाडी गावातील कृषीपंप व घरगुती कनेक्शन चे हूक (आकडे) जे की, ज्या ग्राहकांनी महावितरण कंपनीचे कायदेशीर कोटेशन भरलेले नाही, चोरुन वीज वापर करत आहेत आशांवर महावितरण कंपनीने वरिष्ठ अधिकारी सुहास मिसाळ (उपकार्यकारी अभियंता), व के जी गुंगेवाड (कनिष्ठ अभियंता)यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शना नुसार आकडे काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. 

      

तरी संबंधित भागातील महावितरण च्या सर्व  ग्राहक यांना आवाहन आहे की, महावितरण कंपनीचे कायदेशीर कोटेशन भरुन वीज मीटर घ्यावे व कंपनीस ग्राहकांनी सहकार्य करावे.  ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोरे चंद्रकांत, भालेराव सतीश, भाग्यवंत, राजु वाघमारे इ प्रयत्न करत आहेत.


No comments