Breaking News

लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावरील जाणीवपूर्वक दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत नसता भाजपा च्या वतीने पोलिस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू - रमेश पोकळेबीड : दसरा निमित्त सर्वांचे श्रद्धास्थान असलेले राष्ट्र संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट ता.पाटोदा येथे ऑनलाइन दसरा कार्यक्रम घेणार असल्याचे  आवाहन महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास  मंत्री  लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी केले होते. परंतु महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असणाऱ्या काही तथाकथित सुडाचे राजकारण करणाऱ्या काहींनी सत्तेचा गैर वापर करत पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून पंकजाताई मूंडे यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत नसता भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल व वेळ प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालयालावर मोर्चा काढू असा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अटलजनसेवक  रमेशभाऊ पोकळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाचे थैमान असल्यामुळे लोकनेत्या पंकजाताईसाहेब मुंडे यांनी यावर्षी जाहिर  दसरा मेळावा कार्यक्रम रद्द केला होता व  सावरगाव येथे जावून राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून दर्शन घेतले व महाराष्ट्रातील सर्व समाजातील लाखो भाविक भक्त व कार्यकर्ते यांना  ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या मेळाव्याला कोणीही प्रत्यक्ष उपस्थित राहू नये सर्वांनी आपापल्या गावातच राहून  ऑनलाईन कार्यक्रमास  सहभागी व्हावे असे आवाहन वारंवार केले होते.

याच दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहिर कार्यक्रम संपन्न झाले तसेच बीड जिल्ह्यात हि येडेश्वरी सह. साखर कारखाना ता. केज,  सुंदररावजी सोळंके सह. साखर कारखाना तेलगाव ता. माजलगाव, जय भवानी सह. साखर कारखाना गढी ता. गेवराई जिल्हा बीड या ठिकाणी नियमाचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने गर्दी जमा करून गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित  असलेल्या प्रमुख नेत्यांवर व संयोजक यांच्यावर कोठेही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु सावरगाव येथील ऑनलाईन  दसरा मेळावा येथेच पंकजाताई मुंडे यांच्यासह माजी मंत्री  महादेवरावजी जानकर खा डाॅ भागवतरावजी कराड व  ईतर 40 ते 50 जन यांच्यावर जाणीवपूर्वक राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आला असे ही रमेशभाऊ पोकळे म्हणाले.

या संदर्भात बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना  भाजपाचे प्रमुख पदाधिकारी यांचे शिष्टमंडळाने भेटुन लोकनेत्या पंकजाताई मुंडे  यांच्यावरील जाणीपूर्वक दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याकरिता निवेदन देण्यात आले. 

यावेळी भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेशभाऊ पोकळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम जहांगीर,भाजपा नेते सुभाषजी धस,बीड भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, बीड जिल्हा कोषाध्यक्ष  चंद्रकांत फड,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅड संगिताताई धसे  विक्रांत हजारी,भाजपा नेते भगिरथ  बियाणी,भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.लक्ष्मणराव जाधव, संदिप उबाळे, भाजपा विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष संग्राम बागर, हणुमान मुळीक, हरिष खाडे, विलास बामणे, दत्ता परळकर, दत्तप्रसाद सानप, सुरेश पवार, कपिल सौदा, भाजपा महिला पदाधिकारी  संध्याताई राजपूत, शैलाताई  मुसळे, शितलताई राजपूत, अमोल वडतीले, विजयकुमार खोसे, अभी आघाव, गणेश बहिरवाळ यांच्या सह आदी उपस्थित होते.No comments